मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

मॅट्रिकोतर शिष्यवृत्तीकरीता महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

 पुणेदि. 3: शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली असून या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थीपालकविविध संघटनांपर्यंत व्हॉटस्ॲप ग्रुपतत्सम इतर समाज माध्यमे आदी माध्यमातून पोहचवावी. तसेच महाविद्यालयांनी सूचना फलकांवरही प्रदर्शित करावी.  

मागील शैक्षणिक वर्ष 2024-25 करिताचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात असून हे अर्ज निकाली काढण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांस अर्ज फेरसादर करण्याबाबत महाविद्यालय स्तरावरुन कळविण्यात यावे. कोणतेही विद्यार्थी शिष्यवृतीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता सर्व महाविद्यालयांनी घ्यावीअसे आवाहन सहायक आयुक्तसमाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *