रिसोड तालुक्यात आखाडा पार्टी धूम
कोंबड्या-बकऱ्यांना वाढली मागणी: गावा-गावात रंगताहेत गटारी अमावस्या
दै.महिला संवाद
प्रतिनिधी
वाशिम /रिसोड
बद्रीनारायण घुगे
मांडवा गावात दारुचा महापुर रिसोड तालुक्यात आषाढ महिन्याचे आकर्षण असलेल्या आकाडी जत्रांची धूम सुरू झाली आहे. भाऊबंद, मित्रमंडळी एकत्रित येऊन पै-पाहुण्यांना आवतनं देऊन पीकपाणी व पावसापाण्यावर गप्पांच्या साथीने आकाडीची रंगत वाढू लागली आहे. यावर्षी मे महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी लगेच जुन महीन्यात सुरुवाती पेरणी केली आहे. असे असले तरी वर्षभर शेतात
काबाडकष्ट करावे लागते. त्यामुळे वर्षातून एकवेळ राखण म्हणून शेतात कोंबडी, बकरी देण्याची परंपरा चालू आहे. यासाठी बकरी, कोंबडी शोधताना अनेकांची दमछाक होत आहे. आषाढ सुरू असताना तालुक्यातील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची थोडीफार कामे आटोपली आहेत. आकाडी जत्रा ही रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी केली जाते. काही कुटुंबे, भावकी एकत्रित येत ही जत्रा साजरी करतात.
पंखाच्या कोंबडीला वाढती मागणी
यावर्षी पावसामुळे बाजारात कोंबड्या, बकऱ्यांचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी अनेकजण बाजारात कोंबड्या व बकऱ्या न पाहता, त्या गावोगाव फिरून शोधत आहेत. यासाठी अनेकांची दमछाक होत आहे. आकाडी जत्रांमुळे ज्यांच्याकडे बकरी, कोंबडी आहे, त्यांनी मनमानी दर लावले आहेत. बकऱ्या, कोंबड्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोंबड्याला ७०० ते १००० रुपये पडत आहेत.