अंजनी फाउंडेशन चा अभिनव उपक्रम… स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप
जालना शहरातील अंजनी फाउंडेशन. सामाजिक संस्था
सामजिक कार्यात अग्रेसर अंजनी फाऊंडेशन हे
शिक्षण ,आरोग्य ,रोजगार या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे
विविध उपक्रमांद्वारे समाजातील गोरगरीब गरजूंना मदत करण्यात येते…
अंजनी फाउंडेशन चे संस्थापक बालाजी किरवले यांच्या संकल्पनेतून , स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
मोफत पुस्तक देण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे
स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता
शंभर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत
आज दिनांक 18/5/24 रोजी विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन गांधी चमन या ठिकाणी
महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयचे सचिव ॲड.ब्रह्मानंद चव्हाण सर, ग्राहक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. महेश धनावत सर, विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशनच्या संचालिका
विद्या जाधव….
अंजनी फाउंडेशनच्या अध्यक्ष
ज्योती आडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत…. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे संच देण्यात आले.
शिक्षणामुळे जीवन बदलण्याची व भविष्य घडवण्याची संधी निर्माण होते ह्या उद्दिष्ट पूर्तीसाठी किरवले मित्र मंडळी च्या वतीने पुस्तकांचे संच देण्यात आले ….
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
ॲड. चव्हाण सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणत होते की विद्यार्थ्यांनी ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी चिकाटी व मेहनतीची गरज आहे जास्तीत जास्त मुलीने,मुलांनी शिक्षण घ्यावं आणि शासकीय सेवेत भरतीसाठी तयारी करावी.
जालना शहरातील, शेतकरी कुटुंबातील, एक पाल्य असलेले
साळेगाव, रेवगाव, देवमूर्ती, पांगरी गोसावी, सिंधी काळेगाव,
ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षेच्या तीन पुस्तकाच संच देण्यात आला टप्प्याटप्प्याने अजूनही विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात येणार आहे
याप्रसंगी विद्या ज्योत टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते
अशी माहिती अंजनी फाउंडेशनचे
अध्यक्ष. ज्योती आडेकर उपाध्यक्ष. विजय जाधव यांनी दिली…