संभाजी ब्रिगेड महिला आघाडी ने दिला दिव्यांग तरुणीला आधार!
महिला दिनी जिजाऊंच्या लेकींचे सामाजिक दायित्व
जालना (प्रतिनिधी) : कर्तृत्ववान महिलांचा गौरव, सत्कार सोहळे, अशा विविध उपक्रमांनी महिला दिन सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा होत असतांना जालना शहरातील जिजाऊंच्या लेकींनी महिला दिनाचे औचित्य साधून दिव्यांग तरुणीला आधार देत आपल्या सामाजिक दायित्वाची प्रचिती दिली.
भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयात शुक्रवारी ( ता. 08) हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. संभाजी ब्रिगेड महिला आघाडी च्या वतीने होतकरू, कलावंत असलेल्या उज्वला काळे या दिव्यांग तरूणीस व्हील चेअर भेट देण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी विभावरी ताकट, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदी सीमाताई काकडे- गंगाधरे यांच्या नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी शितलताई तनपुरे, संभाजी ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्षा दीपाली दाभाडे, जिल्हा सचिव ज्योती मुजमूले, शहराध्यक्षा सुवर्णा राऊत- वाघ,उपाध्यक्षा वैशालीताई घुले,संघटिका ज्योती पडोळ, शहर सचिव निर्मला पडोळ,कीर्तीमाला मोरे, दीपाली काळे, भारती कुटे, स्वाती कुटे, प्रतिक्षा आकात, स्नेहल वाघ, आकांक्षा खोटे, जोत्सनाताई देशमुख, उषाताई मिसाळ, हर्षाली पाटील यांच्या सह पदाधिकारी व महिलांची उपस्थिती होती.
महिला सशक्तीकरण, नवी दिशा, अशा विविध विषयांवर उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या आधाराबद्दल उज्वला काळे हिने समाधान मानले. प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहराध्यक्षा सुवर्णा राऊत – वाघ यांनी केले.