लोकसभा निवडणूक कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत. हिंगोली लोकसभेचे क्षेत्र विदर्भ आणि मराठवाडा संयुक्त असल्याने हा गुंतागुंतीचा मतदार संघ असून अनेक मातब्बर नेते आपले नशीब आजमावण्यासाठी ईच्छूक आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हदगाव,हिमायतनगर,किनवट,माहूर,महागाव,उमरखेड,
कळमनुरी,औंढा,वसमत, हिंगोली,सेनगाव अशा एकूण अकरा तालुक्याचा समावेश असून या ठिकाणच्या जातीय समीकरणाचा विचार केल्यास चार लाख बंजारा समाजाची संख्या असून एकंदरीत ७०% असा ओबीसी समाज आहे.
त्यामुळे भारतीय राष्र्टीय काॅंग्रेस ची हिंगोली लोकसभेची उमेदवारी बंजारा समाजामधून दिल्यास चांगल्या प्रकारे विजयाची शाश्वती देता येऊ शकते.सन १९९० पुर्वी स्व.उत्तमराव राठोड यांना उमेदवारी मिळाली होती तेंव्हापासून म्हणजे गेल्या ३४ वर्षापासून बंजारा समाज हिंगोली लोकसभा उमेदवारीच्या प्रतिक्षेत आहे.
याचाच एक भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघातील भूमीपुत्र प्रा.कैलाश राठोड यांनी काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे दि.५ मार्च रोजी रितसर हिंगोली लोकसभा उमेदवारीची मागणी केली.ते सन 2012 मध्ये स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठात 10 पैकी 7 उमेदवाराच्या पॅनलसह सिनेटवर निवडून आले.गेल्या एक अधिक दशकापासून ते भारतीय राष्र्टीय काॅंग्रेस मध्ये एकनिष्ठ राहून पक्षकामात सक्रीय आहेत.तसेच प्रा.राठोड यांनी नांदेड शहरात कोचींग क्लासेस च्या माध्यमातून आजपर्यंत सर्व समाजातील गोरगरीबांच्या मुलांना नाममात्र शुल्कामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना डाॅक्टर , इंजीनीअर व अधिकारी घडविण्याचे महान कार्य त्यांचे हातून झाले, होत आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन 2012 मध्ये तत्कालीन महामहिम राष्र्टपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते प्रा.कैलाश राठोड यांना राष्ट्रपती भवनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह त्यांचे नावलौकीक असल्याने जर हिंगोली लोकसभेची उमेदवारी प्रा.कैलाश राठोड यांना मिळाल्यास राज्यभरातील बंजाराबहूल मतदार संघात काॅंग्रेसच्या बाजूने एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल.तथापी कोणत्याही मातब्बर उमेदवाराला शह देण्याईतपत विजयी होण्याचे सामर्थ्य प्रा.कैलाश राठोड यांच्याकडे आहे असे अनेक तज्ञ जाणकारांचे मत आहे.