जालना समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादनदिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वच्छतेचे महामेरू राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपक बुक्तरे,प्रशासकीय अधीकारी रमेश गजर, डॉ. बालाजी मुंडे, डॉ. सुधीर गायकवाड, डॉ. मधू खोब्रागडे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. रेणुका बडवणे, जगन्नाथ मालवार, प्रकाश दांडगे, अनिल हजारें, किशोर ढेकळे,विष्णु भोसले, राधाकृष्ण देशमुख, शिवाजी भुतेकर,शुभांगी भुतेकर, वैष्णवी भुतेकर आदी उपस्थित होते.