मस्तगड येथे कॉंग्रेसने केलं अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन..अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा केला जाहीर निषेध..
आंदोलनादरम्यान शहा यांचा फोटो असलेलं बॅनर आंदोलकांनी पायाखाली तुडवलं..
पोलिसांनी बॅनर घेतलं ताब्यात..
जालना :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा आज दि.19 गुरुवार रोजी सकाळी अकरा वा. च्या सुमारास मस्तकड येथे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निदर्शने करून जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय.या आंदोलनात काँग्रेसच्या वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.शहरातील मस्तगड भागात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलना दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यानं अमित शहा यांचा फोटो असलेलं पोस्टर पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हे बॅनर ताब्यात घेतलं.
यावेळी दिनकर घेवंदे, कल्याण दळे, धर्मा खिल्लारे, अब्दुल रफिक सर, कैलास मगरे, अशोक बनकर, सुबोध जाधव, गणेश वाघमारे, शामराव लांडगे, मधुकर घेवंदे, रघुवीर गुडे, राजेंद्र जाधव, विकास साबळे, बळीराम तिडके, चंद्रकांत रत्नपारखे, सुरेश एल्गटवार, सिद्धार्थ भिसे ई. ची उपस्थिती होती..