जालना समाजकार्य महाविद्यालयाचा शैक्षणिक उपक्रम
जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना यांच्या वतीने क्षेत्र कार्य अंतर्गत मौजे जळगाव सोमनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. क्षेत्र कार्य समन्वयक प्रा.डॉ.प्रविण कनकुटे यांच्या मार्गदर्शन नुसार हे उपक्रम राबविण्यात आले. क्षेत्र कार्याचे विद्यार्थी यांनी दिनांक 14 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी शाळेचे शिक्षक खलसे सर, आणि भुटेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. राजू वाघमारे, योगेश खोसे, वैष्णवी जगताप, सोमेश गिरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी राखी भूतेकर, दिव्या मोहिते यांना निबंध स्पर्धेतील यश बद्दल बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.