अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजन; विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
जालना: भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील अंजनी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी संस्थेकडे 31 मार्चपर्यंत पूर्व नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंजनी फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी नव संकल्पना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. जालना शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या अंजनीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे विविध उपक्रम घेण्यात येतात.
या वर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना तीन पुस्तकांचा संच देण्यात येणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गांधी चमन सावित्रीबाई फुले चौक येथील अंजनी फाउंडेशनचे संपर्क कार्यालय या ठिकाणी रविवारी ( दि. 31) संध्याकाळी सहावाजेपर्यंत स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकासाठी नाव नोंदणी करावी,
असे आवाहन अंजनी फाउंडेशनच्या सचिव विद्या जाधव यांनी केले आहे.
अंजनी फाउंडेशनच्या संस्थापक बालाजी किरवले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या उद्देशाने स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अंजनी फाउंडेशनच्या कार्यालयात जाऊन करावी असे कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9168567111 या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.