31 मार्च व 7 एप्रिल रोजी स्कॉलरशिप परीक्षा
जालना:महिला संवाद न्युज
नुकतीच इयत्ता 10 वीची परीक्षा संपली आहे. दरम्यान प्रा. दिनेश सर संचलित DS2 शैक्षणिक संकुलात इयत्ता 10 वी तुन 11 वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी 31 मार्च व 7 एप्रिल रोजी DS2 च्या मुख्य शाखेत स्कॉलरशिप परीक्षा अर्थात “DS2” महा fast ही ऑफलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. डॉक्टर व इंजिनीयर होण्याचे मानस ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये 100 टक्के सवलत मिळवण्याची सुवर्णसंधी DS2 ने उपलब्ध करून दिली आहे. 10 वि तून 11 वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर या परीक्षेसाठी नोंदणी करावी असे आवाहन “DS2” चे व्यवस्थापनाने केली आहे.
आताच 10 वी ची परीक्षा पार पडली आहे. आता पालकांना वेध लागते आपल्या पाल्याच्या भविष्याची, पुढील शिक्षणाची 11 वीत चांगल्या कॉलेज सोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या क्लासेसच्या प्रवेशाचे. असंख्य विद्यार्थी इयत्ता 10 वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन NEET, IIT, JEE या परीक्षांच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनीअर आणि इतर क्षेत्रात उज्वल करियर घडविण्याचे स्वप्न पाहत असतात. आज पर्यंत देशातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात जालन्याच्या धरती तून विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन पाठवले आहे म्हणूनच प्रा. दिनेश सर संचलित “DS2” पॅटर्न गुणवत्तेची खान अशी जालन्यात नव्हे तर त महाराष्ट्रात
ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच प्रा .दिनेश सरांच्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पालकवर्ग व विद्यार्थ्यांची तोबा गर्दी करून जालन्याच्या धर्तीवर येत असते. प्रत्येक पालकाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात एकच विषय असतो “DS2” च्या टॉपर्स बॅचमध्ये मध्ये माझा विद्यार्थी असावा, प्रवेश मिळावा, अनेक पालकांच्या मनात असते कुठेतरी सरांनी आमचं आम्हाला सवलत द्यावे कारण त्यांनी ऐकले असते की सरांनी या विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले त्या विद्यार्थ्याला मदत केली म्हणून अनेक पालकांच्या मनातच आपल्या पाल्याला कमी फी लागावी किंवा मोफत प्रवेश मिळावा. याच अनुषंगान “DS2” कडून अकरावी प्रवेश करिता मोठ्या प्रमाणावर
स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक खूप मोठे ग्राउंड निर्माण होते व प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार स्कॉलरशिप मिळवण्याची संधी उपलब्ध होते. याच पार्श्वभूमीवर 31 मार्च व ७ एप्रिल रोजी सर्व शाखेत स्कॉलरशिप परीक्षा ते ही ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा “DS2” पॅटर्नच्या मुख्य शाखेवर होणार आहे . ही परीक्षा NTA नीट पॅटर्नच्या धर्तीवर होणार असून मेडिकल आणि इंजिनिअरिंग यासाठी PCB साठी आणि PCM साठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे. याशिवाय 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 60 दिवसांचा मोफत फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून दिला आहे. यासाठी लवकरात लवकर “DS2″महाFast परीक्षेसाठी www.DS2pattern.in या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी
*विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वेगवेगळ्या स्पेशल बॅचेसची सुविधा उपलब्ध*
यामध्ये 60 टॉपर विद्यार्थ्यांसाठी AIIMS अर्जुना बॅच, सुपर फ्रोटन बॅच, सुपर नोवा बॅच, प्लॅटिनम बॅच कमी विध्यार्थी संख्येच्या बॅचेस व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनासाठी mentor teachers ची नेमणूक, IIT-JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IIT Advance बॅच व त्यासाठी स्वतंत्र तज्ञ शिक्षकांची टीम, विद्यार्थ्यांचे वर्षभर प्रोग्रेस ट्रैकिंग व त्यानुसार personalized counselling. IIT-JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅचेस ही या “DS2” चे वैशष्ट्य आहेत