गुढीपाडवा
“पाडव्याची पाहाट आनंदाची लाट
आनंदाने जुळतात रेशीमगाठ
गुढी उभारून नववर्षाची खरी सुरुवात”
“चैत्रशुद्ध प्रतिपदा हिंदू कालगणनेचा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त!
चैत्र महिन्याची सुरुवात होते तो काळ सर्व दृष्टीने प्रसन्न असतो. हवेत कडाक्याची थंडी न गारवा असतो. तसेच जीव भाजून काढणारा उष्मा ही नसतो
वसंत ऋतुचे आगमन याच महिन्याच्या सुरुवातीस होते चैत्र महिन्यात “मधुमास” असेही म्हणतात… प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात गुडी अंगणात व घराच्या प्रवेशद्वारावर उभारतात धर्मशास्त्रात गुढीला ब्रह्म ध्वज म्हणतात…
जीवन हे कडू गोड अनुभवाची मिश्रण आहे .कडू घोटही तितक्याच ताकतीने पचवता आले पाहिजे म्हणजे तृष्ठ, पृष्ठ होऊन निरोगी आयुष्य जगता येईल.
या दिवसाला पौराणिक व ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत….
“ब्रह्मदेवांनी जी विश्व निर्मिती केली ती ह्याच दिवशी असे ब्रह्मपुराणात म्हटले आहे”
प्रभू रामचंद्र आणि दृष्ट रावणाचा वध करून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हाच दिवस होता विजयी. श्रीराम चंद्राच्या आगमनाचा आनंद लोकांनी गुढ्या उभारून साजरा केला तेव्हापासून आपणही त्या दिवसाची आठवण म्हणून गुढी उभारतो…
आजच्या दिवशी श्री रामचंद्रांनी वालीच्या जुन्मातून दक्षिणेकडे प्रजेची सोडवणूक केली असे अभ्यासकांचे म्हणणे आहे
वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करून गुढी उभारल्या त्यामुळेच गुढीला विजय पताका असे म्हटले
आजही घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी विजयाचा संदेश देते. भोगावर, योगाचा विजय वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विचारांचा विजय मंगलता आणि पवित्रतेची निर्मिती करणारी ही गुढी प्रत्येक सामान्य मानवाला आश्वासन देते की तू असत ते कडून सत्याकडे दुर्गुणांकडून सगुनाकडे जाण्याचा मार्ग सांगते…
महाभारतात वैशंपायन ऋषींनी जन्मजय राजास एक कथा सांगितली…
वसु नावाचा राजा होता तो अत्यंत प्रेमाने प्रजेचे पालन पोषण करीत होता. परंतु काही कारणाने त्याला वैराग्य आले त्यांनी राज्य त्याग केला अरण्यात जाऊन तपश्चर्य केले त्याच्यावर इंद्रप्रसन्न झाला. इंदिराने त्याला वैजयंतीमाला दिली या मालेचे वैशिष्ट्य असे की तो गळ्यात असली म्हणजे युद्धामध्ये कोणतेही प्रकारची जखम होत नाही तसेच कोणी पराभवही करू शकत नाही इंद्राने त्याला आपल्या प्रेमाची खून म्हणून एक वेळूची काठी दिली आणि सांगितले .की तुझ्या राजधानीत परत जा आणि पूर्व प्रमाणेच राज्य कर प्रजेचे पालन पोषण रक्षण कर .भूलोकी तुझ्यासारखा योग्य राजा नाही वसुराच्या परत राजधानीत आला आणि राज्याचे कर्तव्य बजाव लागलं इंद्राचे प्रेमाने तो भरून गेला होता म्हणून त्याने दिलेल्या वेळुच्या काठीला वस्त्रभूषण गंधपुष्प इत्यादीने सुशोभित करून तिची पूजा केली आपल्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर ती उभारली. त्या दिवशी चैत्रशुद्ध प्रतिपदा होती या प्रसंगाची आठवण म्हणून गुढी उभारण्याची प्रथा पडली
थोडक्यात हा गुढीपाडवा चा उत्सव मृत मानवामध्ये चेतना भरून त्याची अस्मिता जागृत करणारा ठरतो.या दिवशी सरस्वती पूजन करण्याची प्रथा आहे विद्यार्थिनी संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःलाच वचन दिले पाहिजे आचरण मंगल व सात्विक बनण्याचा निश्चय केला पाहिजे मग यशाची गुढी कशी उंच अभिमानाने आणि डौलाने फडकत राहील बघा…
वर्ष प्रतीपदेचा आदला दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य अमावस्या आमच्या जाणता राजाचा छावा शंभुराजे औरंगजेबासमोर साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत उभे होते .इस्लाम धर्माचा स्वीकार करणार का? हा प्रश्न वारंवार विचारला जात होता जगेन तर हिंदू म्हणून मरेन तर हिंदू म्हणून… शंभूराजांची जीभ कापल्या गेली
त्यांच्या अंगात्वाची होळी करून टाकली तो दिवस होता फाल्गुन वैद्य अमावस्या!
दुसऱ्या दिवशी हिंदूचा वर्ष प्रतीपदेचा सण औरंगजेबाला वाटले आपण मराठ्यांचा “नामोहरण “केले पण लवकरच त्याच्या लक्षात आले की शंभूराजाच्या बलिदानाने उभ्या महाराष्ट्राला “बलदान” केले आहे.
कारण सारा महाराष्ट्र या वतीने पेटून उठला होता गवताचे प्रत्येक पाते भाल्याप्रमाणे तळपू लागले होते…
वर्ष प्रतीपदेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात घराघरावर भगवा फडकला आणि लोकांनी औरंगजेबाला भगव्याचे तेज जिद्द दाखवून दिली महाराष्ट्रातून औरंगजेबाला हाक लावून लावण्याची जणू प्रतिज्ञा घेतली.
जाधव ,संतांची घोरपडे ,परशुराम पंत प्रतिनिधी व रामचंद्रपंत अमात्य यासारखे वीरांनी “स्वराज्याचा नंदादीप अखंड तेवत ठेवला” या घटनेची आठवण म्हणून आजही पारंपारिक गुढी बरोबर भगवा ध्वजही घरावर फडकण्याची रीत सुरू आहे…
सौ प्रांजल रायपुरे शास्त्रीनगर अकोला