जालना समाजकार्य महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचालित जालना समाजकार्य महाविद्यालयांत सांस्कृतिक विभागाच्या वतीने युवकांमध्ये मतदानाविषयीची जनजागृती व्हावी याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.दीपक बुक्तरे हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. बालाजी मुंडे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. डॉ. बालाजी मुंडे म्हणाले कि मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येकांने हे कर्तव्य बजावले पाहिजे व यातून लोकशाहीला बळकट केले पाहिजे यावेळी प्रा. डॉ. दीपक बुक्तरे म्हणाले कि संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे तेव्हा या अधीकाराचा वापर सर्वानी करावा व निर्भय व निर्भीड पणे मतदानाचा हक्क बजवावा. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के व प्रा. डॉ. दीपक बुक्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळ याबद्दल.माहिती प्रा. डॉ. दीपक बुक्तरे यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू वाघमारे यांनी केले तर आभार संदेश चव्हाण यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक विभाग प्रमुख
प्रा. डॉ. दिपक बुक्तरे