राम
*******************************************
ध्यानात राम आहे भानात राम आहे
मी रामभक्त माझ्या श्वासात *राम आहे*
जगण्यात राम आहे मरण्यात राम आहे
मी रामभक्त माझ्या रक्तात *राम आहे*
उठण्यात राम आहे बसण्यात राम आहे
मी रामभक्त माझ्या भासात *राम आहे*
करण्यात राम आहे कसण्यात राम आहे
मी रामभक्त माझ्या कष्टात *राम आहे*
देहात राम आहे आत्म्यात राम आहे
मी रामभक्त माझ्या ओठांत राम आहे
कवितेत राम आहे गझलेत राम आहे
मी रामभक्त माझ्या शब्दात *राम आहे*
विजय राधामाणिक वासाडे