Mahila Sanvad News in Jalna

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध

  1. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरण्यासाठी सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल उपलब्ध
  2. जालना, दि. 17 (जिमाका) :- 18- जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता दि. 18 एप्रिल 2024 पासून उमेदवाराचे नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन भरण्यासाठी पुढील प्रमाणे वेबसाईट उपलब्ध करुन दिलेली आहे. या https://suvidha.gov.in ऑनलाईन सुविधा कॅन्डिडेट ॲप/पोर्टल वरुन देखील उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन भरता येईल. मात्र नामनिर्देशन भरल्यानंतर उमेदवारास त्याची प्रिंट काढून व त्यावर स्वाक्षरी करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रत्यक्ष सादर करावी लागेल किंवा उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी भेटीचा दिनांक व वेळ घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. याद्वारे मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना कळविण्यात येते की, आपण आपल्या राजकीय पक्षातील सर्व उमेदवारांना सदर ऑनलाईन सुविधा कॅन्डिडेट ॲप/ पोर्टल संदर्भात अवगत करावे. जेणेकरुन उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करतांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.
  3.                                                                  -*-*-*-*-*-*-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *