जालना लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक लढविणार
9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली; चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण
जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 9 जणांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात आता 26 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, यावेळी उपस्थित होते.
जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 35 व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. यापैकी 9 व्यक्तींनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून 26 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या अनुषंगाने निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान यंत्र, मतदान पथके आदी बाबींची पूर्वतयारी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततामय, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके यासह विविध पथकांच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक लढविणारे उमेदवार, पक्ष, निवडणूक चिन्ह पुढील प्रमाणे – कल्याण वैजिनाथराव काळे (इंडीयन नॅशनल काँग्रेस) (हात), दानवे रावसाहेब दादाराव (भारतीय जनता पार्टी) कमळ, निवृत्ती विश्वनाथ बनसोडे (बहुजन समाज पार्टी ) हत्ती, दिपक भिमराव बो-हाडे (समनक जनता पार्टी), रोडरोलर, धनंजय रुपराव काकडे(पाटील) (भारतीय जवान किसान पार्टी) भेटवस्तु, बकले प्रभाकर देवगण (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलेंडर, बाबासाहेब संतुकराव शेळके (समता पार्टी) बॅटरी टॉर्च, भगवान साहेबराव रेगुडे (हिंदुस्थान जनता पार्टी), शिटटी, मुकेश प्रभात राठोड (आखिल भारतीय परिवार पार्टी) जहाज, शाम रुस्तुमराव शिरसाठ (बहुजन रिपब्लीकन सोशॅलिस्ट पार्टी) ऊस शेतकरी, अझहर अनवर सयद (अपक्ष) तुतारी, अब्दुल रफीक अब्दुल लतीफ (अपक्ष) पाण्याची टाकी, अहमद रहिम शेख बागवान (अपक्ष) ॲटोरिक्शा, कडूबा म्हातारबा इंगळे(अपक्ष) किटली , कांबळे मारोती दशरथ (अपक्ष) प्रेशर कुकर, चाबुकस्वार राहुल निरंजन (अपक्ष) नागरीक, तानाजी तुकाराम भोजने (अपक्ष) अंगठी, बाबासाहेब उत्तमराव शिंदे (अपक्ष) कपाट, मनोज नेमिनाथ कोलते (अपक्ष) गॅस शेगडी, मंगेश संजय साबळे (अपक्ष) स्पॅनर, ॲड. योगेश दत्तु गुल्लापेली (अपक्ष) बॅट, रतन आसाराम लांडगे (अपक्ष) करनी, राजेंद्र नामदेव मगरे (अपक्ष) हिरा, विकास छगन लहाने (अपक्ष) एअर कंडीशनर, शाम पावलस रुपेकर (अपक्ष) बासरी, ज्ञानेश्वर दगडूजी नाडे (अपक्ष) शिवन यंत्र.
अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांचे नावे – खान एजाज अहमद मोहम्मद बिस्मीलाह खान, ॲड. भास्कर बन्सी मगरे, रामराव जगन्नाथ दाभाडे, गोरखनाथ राजपूत राठोड, मंजुर पाशा शेख, बासिद युनूस शेख, बनेखाँ नूरखा पठाण, राजु साहेबराव राठोड, ॲड. त्रिंबक बाबुराव जाधव.