Mahila Sanvad News in Jalna

बदनापूर शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, प्रशासनाचे तात्काळ पाणी प्रश्न मार्गी लावावा-ॲड. अकरमखान पठाण

बदनापूर शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई, प्रशासनाचे तात्काळ पाणी प्रश्न मार्गी लावावा-ॲड. अकरमखान पठाण

बदनापूर/प्रतिनिधी
बदनापूर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई नसली, तरी अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपंचायतचच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही स्थिती उद्भवली. शहरात अनेक ठिकाणी शासकीय बोअरवेल घेण्यात आले आहेत. परंतु काही लोकांना त्या बोअरवेलचा पाणीपुरवठा करण्यात नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरले असल्याने पाण्याचा नियोजन कोलमडल्याने किंवा हुसेन नगर मधील काही भागातील नागरिकांना जाणीवपूर्वक बोअरवेलचा न करण्यात असल्याने शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

बदनापूर शहरातील अनेक भागात २० ते २५ दिवस उलटूनही पाणी मिळालेले नाही. हुसेन नगर मधील काही भागातील नागरिकांना बोअरवेलचा पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने त्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर काही भागात पाणीच येत नसल्याने नागरिकांना रिक्षा किंवा टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहरातील या पाणीटंचाईस नगरपंचायतचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे वारंवार जनतेमध्ये चर्चीले जात आहे. या पाण्याची प्रश्नाकडे जिल्हाधिकारी व बदनापूर आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड अकरमखान पठाण यांनी केली आहे.

त्यामुळे नियोजित वेळेत पाणी येणार की नाही, याबाबत नागरिकांना काहीच माहिती नसते. ऐन वेळी नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. नगरपंचायतचा हा नियोजनशून्य कारभार बंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड अकरमखान पठाण यांनी केली आहे.

छोट्या रिक्षा द्वारे 500 व 1000 हजार लिटर पाण्यासाठी किंवा पाण्याचे टँकरसाठी मोजावे लागतात पैसे ज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशा भागात नगरपंचायतने टँकरने पाणी पुरवणे आवश्यक आहे. परंतु असे होत नसल्याने नागरिकांना 200 ते 2000 रुपये खर्चून पाणी बोलवावा लागतो. शहरातील अशा विविध भागात आजही नगरपंचायत पुरेसे पाणी देऊ शकत नाही. असे असतानाही येथील नागरिक मालमत्ताकरासह पाण्याची नियमित पाणीपट्टी भरतात. नगरपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन करून पुरेसे पाणी द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड अकरमखान पठाण यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *