लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024
18-जालना लोकसभा मतदारसंघ
निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी
निवडणूक कामकाजाचा घेतला आढावा
जालना, दि.02 (जिमाका) – 18-जालना लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज निवडणूक कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती दिली. निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस व इतर सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीमती मार्टिन यांनी प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करुन बैठकीस उपस्थित उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले. खर्चाची माहिती अद्यावत ठेवण्याची सूचना त्यांनी केली. निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी दक्षतेने व समन्वयाने पार पाडावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
बैठकीस निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजशेकरा एन., निवडणूक निरीक्षक (खर्च) सरवणाकुमार के., अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल व इतर अधिकाऱ्यांसह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.