पुणे- पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे अधिकृत उमेदवार मा. रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवडा भाजी मंडई येथे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी व शहर उपाध्यक्षा सौ.श्रद्धा शेट्टी यांनी पत्रक वाटण्याचे नियोजन केले होते. शेकडो नागरिकांना महागाई च्या मुद्यांवर बोलत करत यंदा १३ मे रोजी मा.रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या नावाच्या समोरील ‘पंजा’ च्या बटनाला दाबून बहुमताने निवडून द्या महाविकास आघाडी चा घटक पक्ष म्हणून आम आदमी पार्टी च्या वतीने विनंती करण्यात आली*
यावेळी अनेक नागरिकांनी मागील दहा वर्षांपासून वाढलेल्या गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल चे भाव, शाळेच्या वाढलेल्या फिस, जीएसटी अशा अनेक विषयांवर स्वतःहून प्रतिक्रिया व्यक्त केल्या…
या प्रचार मोहिमेत आम आदमी पार्टी चे कट्टर इमानदार अमित म्हस्के, हारून मुलानी, संजय कटारनवरे, शिवाजी डोलारे, मंजुनाथ मनुरे, शमीम मुलानी, अनिल धुमाळ व उमेश शेट्टी यांनी मेहनत घेतली