लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024
18-जालना लोकसभा मतदारसंघ
निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी
नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात
जालना, दि. 6 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या कामाकरीता गठीत विविध कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, तहसिलदार योगिता खटावकर आदी उपस्थित होते.
श्रीमती मार्टीन यांनी मिडिया कक्ष, उमेदवार यांचे खर्चविषयक व्यवस्थापन कक्ष, विविध परवाने व चौकशी कक्ष (एक खिडकी), सी-व्हीजील अॅप कक्ष, संगणक सायबर सिक्युरिटी कक्षाला भेट दिली व संबंधित अधिकाऱ्याकंडून कामाकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
निवडणुकीच्या कामात प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. कोणतीही तक्रार येणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. निवडणुकीतील खर्चविषयक बाबींकडे बारकाईने लक्ष द्यावे. माध्यम कक्षाने उमेदवारांच्या निवडणूक जाहिराती व पेडन्यूजवर लक्ष ठेवावे. सी-व्हीजील ॲपवर प्राप्त तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. परवाने कक्षाने सर्व कागदपत्रे तपासून वेळेवर परवाने द्यावेत, अशा सूचना श्रीमती मार्टीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध नोडल अधिकारी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध कक्षासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळंके, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, एनआयसीचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. आर.पी. पडूळकर आदी उपस्थित होते