Mahila Sanvad News in Jalna

सामाजिक संस्थेच्या वतीने जालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन

जालना महिला संवाद प्रतिनिधी

सामाजिक संस्थेच्या वतीनेजालना शहरात मतदान टक्केवारी वाढीसाठी जनजागृती रॅली चे आयोजन

जालना शहरातील सामाजिक संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती, टक्केवारीत वाढ करण्या करिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाअसून 

जालना शहरातील वेळोवेळी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्था विना मोबदला जनजागृती उपक्रम हाती घेऊन कार्य करत आहे येत्या नऊ तारखेला गुरुवारी सकाळी आठ वाजता मस्तगड इथून मा. शशिकांत हदगल साहेब उपजिल्हाधिकारी ( निवडणूक ) यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मतदान जनजागृती रॅलीची सुरुवात होणार आहे. सदरील रॅली गांधी चमन मार्गे शनी मंदिर व छत्रपती संभाजी राजे उद्यान मोतीबाग या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल. 

  जालना शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने रॅलीत सहभाग नोदवाव..लोकशाहीच्या उत्सवात 

सहभागी व्हावे असे

आवाहन जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गणेशपुर जालना, अंजनी आई फाउंडेशन जालना, उषा फाउंडेशन जालना, विशाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शेवगा जालना, छत्रपती राजे युवा प्रतिष्ठान देवपिंपळगाव जालना या सामजिक संस्थांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *