Mahila Sanvad News in Jalna

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जालना, दि. 9 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी, अंबड तालुक्यातील जामखेड, जालना तालुक्यातील रामनगर व गोलापांगरी येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी द मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 व 5 (अ) अन्वये जारी केले आहेत. वरील गावांमध्ये भरण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरविण्यात यावा, असे आदेशात नमूद केले आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *