मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
मा. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ साहेब,मा. श्रीमती वर्षा मीना मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जालना व मा. शशिकांत हदगल साहेब उपजिल्हाधिकारी निवडणूक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.श्री. श्रीमंत हरकळ साहेब उपविभागीय अधिकारी जालना,मा.श्री.संतोष खांडेकर साहेब महानगरपालिका आयुक्त जालना,मा. श्रीमती छाया पवार मॅडम तहसीलदार जालना व श्री दिलीप सोनवणे साहेब नायब तहसीलदार जालना यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची सचिव एम.डी.सरोदे,अंजनी आई फाउंडेशनच्या ज्योती आडेकर व विद्या जाधव,उषा फॉउंडेशनच्या कोषाध्यक्ष मोहिनी मानकर,विशाल सेवाभावी संस्थेचे भास्कर उघडे, छत्रपती राजे युवा प्रतिष्ठानचे बंडू पाटील नन्नवरे, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालनाचे श्री मधुकर गायकवाड, श्री ज्ञानेश्वर गिराम, प्रवीण प्रशिक्षक संघटनेचे जिल्हा समन्वयक समाधान खरात, प्रवीण प्रशिक्षक रवींद्र भालेराव, नवजीवन संस्थेचे ज्ञानेश्वर गव्हाणे, शिवशाही प्रतिष्ठानचे रोहित जाधव, श्रीमती उषा मानकर, श्रीमती कुशीवर्ताताई अंभोरे,जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत स्वीपचे पदाधिकारी उपस्थित होते
जालना शहरातील सक्रिय सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यातील 46 गावामध्ये मतदान जनजागृती
करण्यात आली. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदात्याने आपल्या मताचा हक्क बजावणे
हे आपले कर्तव्य असून येत्या 13 तारखेला लोकशाहीचा उत्सव
मतदान करून साजरा करायचा आहे. याकरिता
आज दिनांक 9/5/24 रोजी सकाळी आठ वाजता सामाजिक संस्थेच्या वतीने रॅली काढण्यात आली
डॉ.बाबासाहेबांना आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून रॅली ची सुरुवात करण्यात आली व मोतीबाग येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी मोठ मोठ्या घोषणांनी परिसर दनाणुन गेले.
जनजागृती रॅली करिता विद्याज्योत टेक्निकली एज्युकेशनच्या विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.