ग्रामसेवकांच्या गैरहजर पणामुळे सर्वसामान्य ग्रामस्थ त्रस्त..
ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..
बेजबाबदार ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, संतप्त ग्रामस्थांची मागणी..
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील शहागड येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत ग्रामसेवक सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गैरहजर राहतात. ग्रामसेवक दररोज गावात येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहागड येथील ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून तिडके हे कार्यरत आहेत. गावातील नागरिकांना विविध कागदपत्रे घेण्यासाठी ग्रामपंचायत येथे जातात. मात्र ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने नागरिकांना कागदपत्र मिळत नाहीत. शहागड येथे गुरुवारी बाजार भरतो, त्यादिवशी पण वेगवेगळे करणे सांगून ते गैरहजर राहतात. ग्रामस्थांनी त्यांना तुम्ही गावात का येत नाही अशी विचारणा केल्यानंतर बैठकाची कारणे देत ते या प्रश्नांना बगल देतात. दरम्यान गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.