संजीवनी हॉस्पीटलतर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबीर तपासणी नंतर समुपदेशन व औषधोपचाराचा सल्ला
विविध शिबिराच्या माध्यमातून गरजूंना लाभ व्हावा सामाजिक बांधिलकी जपत जालना शहरातील संजीवनी हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बळीराम बागल
याच्या वतीने पत्रकारांसाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन डॉ. बागल यांनी समुपदेशन करून योग्य ते औषधोपचार करण्याचा सल्ला दिला.
जालना शहरातील संजीवनी हॉस्पीटलमध्ये पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लिव्हर, डायबेटिज, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरात ३० पेक्षा
अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदविला. बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव या बाबींचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच सतत तणावात राहिल्यामुळे देखील नकळतपणे काही आजारांची लागण होते. हे टाळण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन आणि तणावमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असून, निरोगी आयुष्यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे डॉ. बागल यांनी सांगितले. शिबिरात डॉ.रमेश गणेशराव सूर्य, डॉ. शिवदास मिरकड, डॉ.कैलास राजगुरु, व्यवस्थापक अमोल कदम आदिनी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली.