नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन धारकावर जालना वाहतूक शाखेची कारवाई
जालना जिल्हयातील सर्व वाहण धारक यांना सूचित करण्यात येते की, आपण आपले वाहण चालवित असताना मोटार वाहण कायदा तथा ताहतुक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु काही वाहण धारक वाहतुकीचे नियम पाळत नाही, त्यामुळे अपघात होऊन जालना जिल्हयात चालु वर्षात 208 अपधात घडलेले असुन त्यामध्ये 118 लोक मृत्युमुखी पडलेले असुन 101 लोक गंभीररित्या जख्मी झालेले आहेत. तरीही काही वाहण धारक मोटार वाहण कायदा तथा वाहतुक नियमांचे पालण करीत नाहीत.
मोटार वाहण कायदा तथा वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहण धारकाविरुध्द वाहतुक शाखा तथा जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 27/05/2024 रोजीपासुन जालना शहरात तसेच जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदीचे तसेच विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले असुन वाहतुकीचे नियम न पाळणाच्या वाहण धारकाविरुध्द अतिशय कडक मोहीम राबविण्यात येत असुन दिनांक 30/05/2024 रोजी पावेतो अशा वाहण धारकाविरुध्द 1) विना हेल्मेट वाहण चालविणे-935 केसेस, 2) ट्रिपल सिट वाहण चालविणे-265 केसेस, 3) मोबाईलवर बोलणे-28 केसेस, 4) नंबर प्लेट संबधीत- 166 केसेस, 5) राँग साईड वाहण चालविणे-12 केसेस, 6) विना लायसन्स वाहण चालविणे-25 केसेस, 7) दारु पिऊन वाहण चालविणे 39 केसेस, या प्रमाणे मोहीमे अंतर्गत कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच यापुढेही नियमितपणे मोहीम राबविण्यात येत आहे. तरी सर्व वाहन धारक यांनी वाहतुक नियमांचे पालण करावे व अपघात टाळावा
तसेच आपल्या वाहणावर प्रलंबित असलेला ई चलान कार्यवाहीचा दंड वाहण धारक यानी तात्काळ भरुन घेण्यात यावा अन्यथा आपल्या वाहणाविरुध्द कायदेशिर कार्यवाही करून निद्यमान न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी
या बाबत जालना जिल्हयातील सर्व वाहण धारक यांना मा. पोलीस अधिक्षक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब जालना यांनी आवाहण केले आहे.