साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शैक्षणिक जागृती मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन
जालना, दि. २२(प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शैक्षणिक जागृती
मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्याचेआयोजन ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जेईएस महाविद्यालय येथे करण्यात आले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शैक्षणिक जागृती मंचातर्फे मातंग समाजातील
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन व्हावे. यासाठी ७ जुलै
रोजी सकाळी ११ वाजता जेईएस महाविद्यालय या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून मातंग समाजातील १० वी, १२ वी
परिक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. विद्यार्थी व निट,जेईई व
इतर स्पर्धा परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपली
नावे गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रतिसह संयोजन समितीकडे किंवा ९८८१४८०१९० व ९२८४२३४१४७ या व्हॉटसअॅप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन साहित्यरत्नअ ण्णाभाऊ साठे शैक्षणिक जागृती मंचचे अध्यक्ष नामवाड यांनी केले आहे.