बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे जालना येथे आयोजन…
जालना दि.24 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. बुधवार दि.26 जून 2024 सकाळी 11 ते दु.2 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जागेवर निवड संधीसाठी हरीबाबा टेक्नो हब इंडिया प्रा.लिमिटेड जालना यांची कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेल्स मॅनेजर 2 पदे, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मार्केटिंग ऑफिसर 5 पदे, टेलीकॉलर 5 पदे, तसेच टेक्नीशियन 2 पदे आहेत. तसेच स्पंदना स्फूर्ति फाइनेंशियल प्रा.लिमिटेड यांची बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ट्रेनी क्रेडीट सहायक 50 पदे, कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सिनिअर क्रेडीट सहायक 25 पदे असे एकूण 89 पदाकरीता मागणीपत्र प्राप्त झाले असून नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in त्याचप्रमाणे www.ncs.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील नोकरीसाधक (Job Seekar) लॉगिनमधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील PLECEMENT DRIVE 02 (2024-25) JALNA याची निवड करावी. उद्योजक-नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. किवा ऑनलाईन सह्भाग नोंदवला नसला तरी कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो,शैक्षणिक व व्यावसायिक पात्रत आदि कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवावा. जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे बुधवार दि.26 जून 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.