चंदनझिरा भागात तरुणाचा चाकूने भोसकून खून दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
जालना शहरातील चंदनझिरा परिसरात सैय्यद नदीम सैय्यद रहीम या तरुणाचा रात्री ११ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे._
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन, तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे._
या खूनप्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीत इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे दरम्यान, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत, एक जमाव आज सकाळी पोलीस ठाण्यात आला होता