समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू… अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती…
नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने घडला अपघात…
जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. स्विफ्ट कारणे धडक दिल्यानंतर ईरटीका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती आहे. रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH.12. MF. 18 56 मध्ये डिझेल भरल्या नंतर विरुद्ध दिशेने या कारणे नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रमांक MH. 47. BP .54 78 ला जोरदार धडक दिली. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक 351 कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून यात साहा जणांचा दुर्देवी मृत्यू झालाय, तर तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. एका गंभीर जखमीला छत्रपती संभाजीनगर कडे नेत असताना त्याच्याही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचाव कार्य करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केलाय.
जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावातील समृद्धी महामार्ग चॅनल क्रं. 351 वर सदर अपघात घडलाय. यात 10/12 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 4 प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलय, तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेत 6 प्रवासी मयत झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. उमेश जाधव वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना