जालन्याच्या घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाचं शटर उघडेना..
शव विच्छेदनासाठी जावे लागते मागच्या दाराने..
शुभविच्छेदनगृहात दुर्गं आणि घाणीचे साम्राज्य..
मरणानंतर ही व्यक्तिंना सोसाव्या लागताय यातना..
समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज…
शव चिकित्सा गृहातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणा चा मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागतोय सामना…
जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवचिकित्सा गृह अर्थात शवविच्छेदन गृहाचं शटर उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय. शवविच्छेदनासाठी सुसज्ज अशी इमारत हवी असल्यानं आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्चुन जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शव चिकित्सा गृह उभारले. मात्र या शव चिकित्सागृहाचे शटर मागील काही दिवसांपासून उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय. शटर जाम झाल्याचं कारण देत सर्व मृतदेह हे मागच्या दाराने उत्तरीय तपासासाठी रुममध्ये नेले जात आहेत. त्यामुळं मयत व्यक्तींना मेल्यानंतर ही यातना सोसाव्या लागताय. शिवाय मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना ही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्याचा काय उपयोग असा सवाल आता सर्व सामान्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून शव चिकित्सा गृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा सामना मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय.