शारीरिकदृष्ट्या विशेष सक्षम असलेल्या आदित्य घुलेचे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश…
राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य घुलेने पटकावला तिसरा क्रमांक…
घवघवीत यश संपादित केलेल्या आदित्यवर होतोय कौतुकाचा वर्ष…
जालना: शारीरिकदृष्ट्या विशेष सक्षम असलेल्या जालन्याच्या आदित्य घुलेने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावलाय. 24 ते 28 जून दरम्यान झारखंड येथील टाटा स्टील जेआरडी टाटा स्पोर्ट्स येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौथ्या ऑल इंडिया विशेष सक्षम फिडे गुणांकन राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत व्हीलचेअर श्रेणीमध्ये जालनाच्या आदित्यने नऊ पैकी सहा गुण घेत तिसरा क्रमांक पटकावलाय. आदित्याने पहिल्या चार फेरीत तीन विजय प्राप्त केले. तर पाचव्या फेरीत सुरेश अगरवाल यास पराभूत केले, सहाव्या फेरीत जगदीश बलुरागीला, सातव्या फेरीत नभनील दासला आणि आठव्या फेरीत प्रकाश बंसकरला याला नमविले. नवव्या फेरीत येसू बाबू के. सोबत आघाडी घेत आदित्यने तिसरा क्रमांक मिळवलाय. आदित्य घुले ने संपादित केलेल्या यशामुळे महाराष्ट्राचे नावलौकिक केलय. टाटा स्टीलचे चाणक्य चौधरी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. दरम्यान आदित्य याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्थरातून कौतुक होतेय.