Mahila Sanvad News in Jalna

स्टॉप डायरिया अभियान गावागावात राबवा… जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश…

स्टॉप डायरिया अभियान गावागावात राबवा…  जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश…

स्टॉप डायरिया अभियान गावागावात राबवा…

  • जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश…

जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यामुळे जलजन्य आजार होणार नाहीत. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात १ जुलै ते 31 ऑगस्ट या दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार असून सदरील अभियान जिल्ह्यातील गावागावात राबविण्यात यावे असे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्रकल्प संचालक ज्योती कवडदेवी, कार्यकारी अधिकारी (ग्रापापु) विद्या कानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गजानन मस्के यांची उपस्थिती होती.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार १ जुलै पासून पुढील दोन महिने स्टॉप डायरिया अभियान राबविले जाणार आहे. या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून शुद्ध पाण्याचे महत्व सांगण्यात येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता विषयक बाबीवर जन जागृती , पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर, बॅनर्स लावणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती करणेआदि कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जास्तीत जास्त गावे ओडीएफ अधिक करण्यासाठी स्वच्छता विषयी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गावातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, येथे स्वच्छता जागृती कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये कुजनारा व न कुजणारा कचरा यासाठी स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाड्यामध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता, आरोग्य इत्यादी विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता विशेष विशेष स्वच्छता संमेलन आयोजित करणे, विद्यार्थी व शिक्षक यांचे मध्यान भोजन यासाठीची स्वच्छता व स्वच्छते विषयी जाणीव जागृतती करणे, गावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंट बाबत विशेष मोहीम राबवणे. सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांना शोषखड्डा तयार करणे, घरातील सांडपाणी परसबाग किंवा शोषखड्डात सोडणे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांना या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे.

छतावरील पाऊस पाणी संकलन करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करणे, अतिसाराचा सामना करण्यासाठीसुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर शालेय स्तरावरील चित्रकला, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन स्पर्धा चे आयोजन करणे. गृह भेटी द्वारे पत्रकांचे वाटप करणे, आदि उपक्रमाद्वारे स्टॉप डायरिया अभियान गाव पातळीवर यशस्वीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनखाली प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कवडदेवी नियोजन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *