कोतवाल पदभरतीसाठी प्रशासन सज्ज
6 जुलै रोजी दु. 3.30 ते 5.00 या वेळात परिक्षा
कडक बंदोबस्तात घेण्यात येणार परिक्षा
गैरप्रकार टाळण्यासाठी होणार वेबकास्टींग
प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई*
गैरप्रकार आढळल्यास दोषीविरुध्द होणार कडक कारवाई
जालना, दि. 4 (जिमाका) — जालना जिल्ह्यातील कोतवाल संवर्गाची पदभरतीसाठी अध्यक्ष व सदस्य कोतवाल निवड समिती यांच्याककडून प्रसिध्द करण्यात आलेल्याा जाहिरातीनुसार रिक्त पदासाठी शनिवार, दिनांक 6 जुलै 2024 रोजी दुपारी 03.30 ते 5.00 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्यााने सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्ये्क परीक्षा हॉलचे वेबकास्टींगव्दारे चित्रीकरण करण्या्त येणार आहे. परीक्षार्थीं जिल्हा नियंत्रण कक्षातून स्वतः जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत देखरेख ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी यांची फेस डिटेक्शन कॅमेराव्दारे (Face Detection Camera) नोंद घेण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षक, जालना यांच्याकडून प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सपोनि/पोउपनि दर्जाचा अधिकारी, दोन पुरुष अमंलदार व दोन महिला अंमलदार असा बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याेत आलेला आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पथकामार्फत प्रत्येिक परीक्षार्थीची हँडहेल्ड मेटल डेटक्टर (HMD) व्दारे परिपुर्ण तपासणी करण्यात येणार आहे. परीक्षार्थी यांना कुठल्याही प्रकारचे प्रतिबंधीत साहित्य /वस्तू/उपकरण परीक्षा केंद्रावर आणण्यास/सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यास आली आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर वर्ग एक दर्जाचे अधिकारी जसे उपजिल्हाउधिकारी व त्यांचे समकक्ष असलेल्या्असलेल्या व अधिकारी यांची निरीक्षक अधिकारी म्हाणून नियुक्ती करण्यात आली असून सदर निरीक्षक अधिकारी यांचे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास अगोदर पासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत उपस्थित राहून देखरेख ठेवणार आहे. तसेच सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार हे प्रत्येाक केंद्रावर नियुक्त असून त्यांच्या पथकामार्फत परीक्षा हॉलमध्ये ही परीक्षार्थींची झडती घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या आवारातही कडेकोट बंदोबस्त् ठेवण्याेत आलेला आहे. परीक्षेदरम्यान कुणी गैरप्रकार करताना आढळून आल्यास दोषीविरुध्द प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यारत येणार आहे.
सर्व केंद्रप्रमुख,पर्यवेक्षक,समवेक्षक व तपासणीसाठी नियुक्त करण्याकत आलेले पथक यांना दिनांक 5 जुलै 2024 रोजी परीक्षेबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.