राष्ट्रीय लोकअदालतचे 27 जुलै रोजी आयोजन
जालना, दि. 11 (जिमाका)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्या अंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन.आय. अॅक्टची प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणं व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणं इत्यादी प्रकरणांसाठी दिनांक 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधीतांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणं लोकअदालत मध्ये ठेवावीत व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.