रा से यो कार्यक्रम आधिकारी म्हणून प्रा.प्रविण कनकुटे यांची नियुक्ती
राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालय मधील एक महत्वाचा विभाग असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र बद्दल जाणीव निर्माण करणे आणि राष्ट्रीय कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे यासाठी एनएसएस कार्य करीत असते.
रामनगर येथील जालना समाजकार्य महाविद्यालय मधील एनएसएस कार्यक्रम अधिकारी म्हणून महाविद्यालय मधील प्रा. डॉ.प्रविण कनकुटे, यांची नियुक्ती प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेत जास्तीत जास्त विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील लोकसहभाग वाढवून शाश्वत कार्य केले जाईल असे यावेळी नवनियुक्त एनएसएस प्रमुख डॉ.प्रविण कनकुटे यांनी मनोदय व्यक्त केला.