जालन्यात बस चालकाची दुचाकीला धडक..
दुचाकी वरील दोघे जखमी, एकाचा पाय झाला फ्रॅक्चर.. चालकाविरुद्ध सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
22 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथून यश कदम आणि त्याचा मित्र गौरव सरदार हे दोघे बुलढाणा कडे दुचाकीवर निघाले होते. यादरम्यान देवलगाव राजा रोड जालना येथील वनीकरण नर्सरी जवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बस ने जोराची धडक दिली. दोन्ही तरुण जेल पोलीस भरतीची मैदानी चाचणी देवुन छत्रपती संभाजी नगर वरून बुलढाणा निघाले होते. त्या दरम्यान त्यांच्या दुचाकी क्रं. MH28BT5185 ला एस.टी. बस क्र. MH14BT1597 चा चालकाने जोराची धडक दिली. सदर बस चालक त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत होता. यावेळी बस चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण हे जखमी झाले. त्यातील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यावरून यश विजय कदम वय 20 वर्ष रा. शिक्षक कॉलनी, सिंदखेड राजा, जि. बुलढाणा यांच्या फिर्यादी वरून बस चालकाविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात कलम 281, 125(a), 125(b), 184, कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 24 बुधवार रोजी सदर बाजार पोलिसांनी दिली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करीत आहेत.