जालन्यातल्या केंधळी पाटीवर सकल मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन
..सुमारे अडीच तास चालले रस्ता रोको आंदोलन..
तर सहा तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत मनोज जरांगेंना दिला पाठिंबा..
जालन्यातल्या मंठा तालुक्यातील केंधळी येथील मराठा समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत केंधळी येथील सहा मराठा तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलय. मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार जोंधळे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत त्यांना मोबाईल टॉवरवरून खाली उतरवले. तर केंधळी पाटी जवळ मराठा आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर – नांदेड महामार्गावर अडीच तास रस्ता रोको करून तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना मराठा आरक्षण मागणीच निवेदन दिलय. यावेळी रस्ता रोको आंदोलनामुळे राज्य
महामार्गावर वाहनांच्या रंगाचा रांगा लागल्या होत्या.