बदनापूर येथील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेत झालेल्या रक्कम गैव्यवहाराप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल…
पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल…
मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे 33 लाख 88 हजार 329 रुपयांचा झाला गैरव्यवहार…
जालन्यातल्या बदनापूर येथील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेत झालेल्या रक्कम गैव्यवहाराप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह संचालक मंडळावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे 33 लाख 88 हजार 329 रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सदर संस्था ही लेखापरिक्षणासाठी प्रमाणित लेखापरिक्षक दादासाहेब भानुदास ठोंबरे यांच्याकडे होती. त्यांनी मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे दि 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण पुर्ण करुन दि. 11 मार्च 2024 रोजी बदनापूर येथील सहायक निबंधक डी. एच. बेरा यांनी लेखापरिक्षण अहवाल सादर केला होता. सदर लेखापरिक्षणात निदर्शनास आलेल्या अपहाराबाबत विर्निदिष्ठ अहवाल संबधित सहाय्यक निबंधक कार्यालय बदनापूर कार्यालयास सादर केला. सदर अहवालावर सहाय्यक निबंधक, बदनापूर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम ८१ (५) (ब) अन्वये अपहार करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलंय. ठेवीदाराच्या हिताच्या दृष्टीने सहकार विभागाव्दारे नागरी पतसहकारी संस्थांच्या बाबतीत विशेष मोहीम सुरु केलेली आहे. त्यानुषंगाने शरद जरे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (प्रशासन) छ. संभाजीनगर यु.बी. भोसले, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) छ. संभाजीनगर, पी. बी. वरखडे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना,. डी. एच. चव्हाण जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, जालना व पी. एच. बेरा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, बदनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा नोंद केलाय.