Mahila Sanvad News in Jalna

देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वृक्ष लागवड….

देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वृक्ष लागवड….

देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वृक्ष लागवड….

संस्थेच्या वतीने पन्नास झाडांची केली लागवड..

आज दिनांक 31 जुलै 2024 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरातील जे ई एस कॉलेज रोड या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेमध्ये देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून 50 वृक्ष लागवड करण्यात आली आहे, यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोन वृक्षांचे लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची सुद्धा ग्वाही याप्रसंगी दिली आहे, तसेच यावेळी शिक्षकांच्या वतीने ही शाळेचे अध्यक्ष आत्मारामजी मुंडे यांना ग्वाही देण्यात आली आहे की येत्या वर्षी तुम्हाला हे जे लावलेले झाडे आहेत हे फुललेले व चांगल्या अवस्थेत दिसतील अशी ग्वाही यावेळी शिक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे. याविषयी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, आमच्या प्रशालेत अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात बरेच दानशूर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक ,वह्या असं वाटप होऊन विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो 28 जून या रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष भुजंग यांच्या पत्नीच निधन झालं होतं. त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ जवळपास 35 मुलांना वर्ग नववी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणि वह्याचं वाटप करण्यात आले. जवळपास त्याची किंमत 35 हजार असेल, अशा प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करते अशी माहिती जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक एस वाय भुजंग यांनी दिली आहे. याप्रसंगी देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले, आतापर्यंत देवा सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेने जवळपास पाचशे झाडे लावले आहेत. पन्नास हजार झाडे लावण्याचा त्यांचा मानस असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष आत्माराम मुंडे, यांच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच आपण कोणाला गावात परिसरात वृक्षारोपण करायचे आहे त्यांनी देवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष आत्माराम जी मुंडे, सचिव किशोर ताजी, भुजंग एस. वाय, खरात पी. जी, गुल्लापेल्ली आर डी, डोईफोडे, देवरे, व्हीडी जाधव, पी.के.नजिमा बेगम, हसीना बेगम, हिना कौसर, सिद्दीकी बुशरा, आयेशा बेगय, शहाना तबस्सुम, खंदारे, वाघमारे,

घाटेकर, मुमताज बेगम, फातेमा बेगम, आडेकर, भालेराव, यांच्यासह विद्यार्थी हि मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *