Mahila Sanvad News in Jalna

जालना शहरात बिबट्याचा वावर- बिबट्याच्या दर्शनामुळे शितल विहार कॉलोनी परिसरात भीतीचे वातावरण…

जालना शहरात बिबट्याचा वावर- बिबट्याच्या दर्शनामुळे शितल विहार कॉलोनी परिसरात भीतीचे वातावरण…

शहरात बिबट्याचा वावर- बिबट्याच्या दर्शनामुळे शितल विहार कॉलोनी परिसरात भीतीचे वातावरण…

एक बकरी व दोन हरणं केली फस्त…

विनविभागाने केली पुष्टी…

नागरिकांनी रात्री अपरात्री सूम-साम ठिकाणी एकटे न फिरण्याचे वन विभागाचे आवाहन…

जालन्यात गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील नाव्हा रोड सिंदखेडराजा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांतच आता वन विभागाच कार्यालय असलेल्या कणकनेश्वर महादेव मंदीर परिसरातही बिबट्या पहावयास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचचं म्हणणं आहे. याच बरोबर जालना शहरातील शितल विहार कॉलोनी मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. सदर ठिकाणच्या रहिवासी नागरिकांनी याची माहिती आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली तसेच सीसीटीव्ही फुटेज वन विभागाला दाखवले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.
तसेच शहरांमध्ये टेलीकॉम कॉलनी, प्रशांतीनगर भागात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याच सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने बिबट्याची दहशत आता जालना शहरात पाहायला मिळत आहे. बिबट्याच्या शोधार्थ वन विभागाच्या पथकाकडून शीतल विहार परिसरत पाहणी सुरु करण्यात आली असून वन विभागाचे उद्यान ही सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. वन विभागाकडून सदर प्राणी हा बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बिट्यानी परिसरात दोन हरण आणि एक बकरी फस्त केली असल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केलीय. दरम्यान रात्री अप रात्री नागरिकांनी एकटे फिरू नये, सून साम ठिकाणी जाऊ नये असे आवाहन आज दिनांक 7 बुधवार रोजी 5 वाजेच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी कैलास नागरगोजे यांनी केलय. दरम्यान वनपरीक्षेत्र अधिकारी जालना कैलास नागरगोजे, वनपरीमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोमळे, वनपरिमंडळ अधिकारी बदनापूर रेखा दूनगहू , वनरक्षक जालना बालाजी घुगे, वनरक्षक खांबेवाडी अशोक दांडगे, वनरक्षक चितोडा तेलग्रे आणि वनरक्षक उंबरी मुटके यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *