जालना समाजकार्य महाविद्यालयामध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
दि 3 सप्टेंबर 2024 रोजी कर्मवीर प्रतिष्ठान संचलित जालना समाजकार्य महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने एमएसडब्ल्यू व बीएसडब्ल्यू प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. बालाजी मुंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी, श्री रमेश गजरे उपस्थित होते यावेळी यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालूनपूजन करण्यात आले यानंतर एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी श्रद्धा धुमाळ हिने स्वागतगीत सादर केले तर योगेश पवार यांनी बासरी वादन केले यावेळी अमजद खान, शरद डोईफोडे, विठ्ठल फाजगे,दिपाली आंबेडकर,सोमेश गिरी, प्रथम सावंत,अमृत शेळके, भारती राठोड,ज्ञानेश्वर इंदोलकर, शुभम फुके आदिनी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ.नरसिंग पवार, डॉ. सुधीर गायकवाड, डॉ. रेणुका बडवणे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. प्रवीण कणकुटे, आदिनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक या कार्यक्रमाचे आयोजक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक बुक्तरे यांनी तर सूत्रसंचालन राजू वाघमारे यांनी केले तर आभार अमृत शेळके यांनी मानले या कार्यक्रमास प्रकाश दांडगे, अनिल हजारे, किशोर ढेकळे,डॉ. मधू खोब्रागडे, जगन्नाथ मलवार,दीपिका धुमाळ, नसरीन पठाण, रमा काळे, गीता राठोड आदी उपस्थित होते.