एनएसएस चां विद्यार्थी राष्ट्र भावनेने प्रेरित पाहिजे…डॉ.सुधीर गायकवाड.
एनएसएस विभागाचे काम हे राष्ट्र उभारणी साठी अतिशय महत्वाचे असून देशातील महत्त्वाच्या समस्यांवर काम करून त्यांची सोडवणूक करणे आणि हे काम स्वयंप्रेरणेने करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. सुधीर गायकवाड यांनी जालना समाजकार्य महाविद्यालय, रामनगर येथे एनएसएस विभागाचे उद्घाटन आणि शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण कनकुटे यांनी केले होते, तर उद्घाटक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय चे प्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत वनांजे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी एमएसएस मध्ये सहभागी होऊन राष्ट्रासाठी आपले योगदान द्यावे आणि त्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा असे मत प्रा.डॉ.प्रशांत वनांजे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून रमेश गजर, डॉ. नरसिंग पवार, डॉ. बालाजी मुंडे, डॉ.रेणुका बडवणे,डॉ.मधू खोब्रागडे, डॉ. दीपक बुक्तरे, डॉ. मीना बोर्डे, विकास पाटील, ऋषिराज पाटील, श्याम कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश खोसे, तर आभार आकाश आढे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालय चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.