चल सखे दंगल घडऊ आंबेडकर
विचारा च्या तुफानी वादळाची
ज्यान माणूस बनवलं तुला मला आणि
काश धरू सुशिक्षित होण्याची
ज्यान माणूस बनवलं तुल
मला सखे दंगल घडऊ शिवबा च्या
आदर्श व्यक्ती महत्वची अठरा पगड
जातीत मिळून मिसळून राहण्या ची
चल सखे दंगल घडऊ तुकोबा च्या
गाथ्याचि कोणी कुणा वाचून राहत
नाही करू सेवा मात्या पित्याची
त्यातच खरा लपलेला देव आहे
गाथा सांगूया तुकोबाचि
चल सखे दंगल घडऊ ज्योती साऊ
यांच्या शिक्षणाची तू ही शिक मी ही
शिकतो शिकऊ भावी पिढीला मग
कश्याला चिंता त्यांच्या भवितव्याची
चल सखे दंगल घडऊ सम्यक सम बुद्ध
होण्याची रंगाचे चिंध्या फेकून दे हातात
पंचशील धर आपण वाट धरू त्रिसरणाचि
प्रयत्न करू माणसात मानवता पेरण्याची
विशाल घोडके….