मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाजा लना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना, दि.13 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमानूसार सोमवार दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने दुपारी 2.15 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार पिंपळगाव) शिवारात गट क्र. 258, 259 हेलिपॅड ता.घनसावंगी येथे आगमन व मोटारीने कुंभार पिंपळगावकडे प्रयाण करतील.
दुपारी 2.30 वाजता ब्ल्यू सफायर फुड प्रोसेंसिंग युनिट-2 चे भूमिपुजन कामानिमित्ताने भव्य शेतकरी मेळावा कार्यक्रमास मौजे कुंभार पिंपळगाव येथे उपस्थिती. दुपारी 4 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार पिंपळगाव) शिवारातील हेलिपॅडकडे रवाना. दुपारी 4.15 वाजता मौजे आरगडे गव्हाण (कुंभार पिंपळगाव) शिवारात गट क्र.258, 259 हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.