भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या त्रुटी पुर्ततेसाठी आवाहन
जालना, दि.17 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णयान्वये शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. सन २०२१-२२, सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या ज्या विद्यार्थ्यानी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केली नाही त्यांना स्वाधार योजनेचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर अदा करता आले नाही. तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर केलेल्या व अद्यापपर्यत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा न झालेल्या सर्व विद्यार्थ्यानी समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहुन अर्जातील त्रुटीची पुर्तता दि. 24 ऑक्टोबर 2024 पर्यत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.