Mahila Sanvad News in Jalna

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण…

  • मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची नियुक्ती

जालना,(जिमाका) दि. 17 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी  मतदान होणार आहे. याकरिता मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे पहिली सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण  पांचाळ यांच्या उपस्थितीत आज पार पडली. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रविंद्र पडूळकर, नायब तहसीलदार श्रीमती वैष्णव यांची उपस्थिती होती.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जालना जिल्ह्यातील 1 हजार 755 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ (रॅण्डमायझेशन) एकूण 9 हजार 855 अधिकारी कर्मचाऱ्यांची  करण्यात आली. त्यानुसार आता संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे आदेश वितरीत करण्याची कार्यवाही होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *