माळशेंद्रा येथील नवयुवकांचा अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
जालना : युवकांचा ओढा हा शिवसेनेकडे का आहे तर त्याला कारणही तसेच आहे. कोणत्याही युवकाकडे दुर्लक्ष करण्याची सवय शिवसेनेला नाही. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे बोलतांना दिली.
श्री. खोतकर म्हणाले की, शिवसेनेत येणार्या नवयुवकांकडे कदापिही दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांनाही न्याय दिला जाईल, असे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, देशात आणि राज्यातही एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे त्याचा लाभ अलगदपणे राज्याला होतो. त्या अनुषंगानेच हे राज्य पुढे चाललेले आहे. त्यामुळे येणार्या काळात आणि आगामी निवडणूकीतही युवकांनी तन- मन- धनाने काम केल्यास त्याचा फायदा हा शिवसेनेलाच होणार असल्याचेही श्री. खोतकर यावेळी म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते यांची विशेष उपस्थित होती. तर प्रवेश कर्त्यांमध्ये राजू लोखंडे, गणेश लोखंडे, कैलास लोखंडे, प्रकाश लोखंडे, सुनिल लोखंडे, विजय लोखंडे, विशाल लोखंडे, वकरास लोखंडे, सखाराम घुले, सुभाष काटकर, गजानन जाधव, मनोहर लोखंडे, लहु लोखंडे, भारत साठे, अनिल लोखंडे, शंभु लोखंडे, अजय लोखंडे आदींचा समावेश आहे. याप्रसंगी अनेक शिवसैनिक, पदाधिकार्यांची उपस्थिती होती.