जागतिक आयोडिन न्युनता विकार नियंत्रण दिन…
२१ ऑक्टोंबर २०२४ दरवर्षी २१ ऑक्टोंबर रोजी जागतिक आयोडिन न्युनता विकार नियंत्रण दिन साजरा करण्यांत येतो. भारतामध्ये आयोडिनची कमतरता लक्षात घेऊन केंद्र शासनाने सन १९६२ पासुन राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यांत आला. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे नांव सन १९९२ मध्ये बदलुन राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम असे करण्यांत आले. हा दिवस साजरा करण्यांचे उदिष्ट गलगंड, आयोडिन न्युनता विकार कमी करुन नियंत्रित ठेवणे तसेच त्याबाबत जनजागृती करुन भविष्यात या रोगाचे रुग्ण आढळुन येणार नाही याची दक्षता घेणे. आजच्या युगात फास्टफुड मॅगी, जंकफुड, पिझ्झा, बर्गर खाण्याच्या प्रमाणातः मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. आजच्या तरुणपिढीला फास्टफुड खाण्याची सवय लागली. त्यामुळे आयोडिनयुक्त अन्नपदार्थ, मीठाचा अभाव होतो. परिणामी आयोडिनच्या अभावामुळे गलगंड, थायरॉईड, शरीराची वाढ खुंटणे, हदयाची गती, शरीराचे तापमान, स्नायु आकुंचन, मानसिक आरोग्य व मेंदुवर परिणाम होतो. गळयाला सुज येणे, अनअपेक्षित वजनामध्ये वाढ होणे किंवा कमी होणे, थकवा, डोक्यावरील केस जाणे, त्वचा कोरडी पडणे इ. लक्षणे आढळुन येतात. भारतात उत्तरप्रदेश, विहार, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आयोडिनची कमतरता असलेले रुग्ण आढळुन येतात. भारतात ६.१ करोडपेक्षा जास्त लोक गलगंड या आजाराने ग्रस्त असुन जवळपास ८८ लाख रुग्ण मानसिक व शारीरिक वाढ खुंटलेले रुग्ण आहेत. राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आयोडिनची कमतरता असलेले रुग्ण शोधणे व गलगंड रुग्णांची शोध मोहिम राबविण्यांत येते. आरोग्य कर्मचारी मीठांच्या नमुन्यांची तपासणीसाटी नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. आरोग्य कर्मचा-यांच्या मार्फत गलगंड संक्रमित भागातील व आदिवासी भागातील स्त्रीयांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व अर्भक मृत्यु रोखण्यासाठी आयोडिनयुक्त मीठाचे पॉकिट वाटप केले जाते. गलगंड व आयोडिन कमतरता आढळून आलेल्या भागातील लोकांचे लोकांचे लघवीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यांत येतात. गर्भधारणेनंतर आयोडिनची कमतरता असु नये अन्यथा बाळाच्या मेंदुवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आयोडिन युक्त मीठाचा वापर करणे हाच एकमेव उपाय आहे. जो सहज आणि सोपा आहे. आपल्या शरीरातील थायरॉईड ग्रंथीकरिता आयोडिनची आवश्यकता असते. आपल्या शरीरासाठी १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची आवश्यकता असते.
आपल्या शरीरासाठी वयोगटाप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनानुसार आयोडिनची आवश्यकता खालीलप्रमाणे आहे. अ.क्रं. वयोगट १ २ ३ ४ ० ते ५ वर्षे ६ ते १२ वर्षे १२ वर्षे पासुन पुढे गर्भवती/स्तनपान स्त्री आयोडिनचे प्रमाण ९० मायक्रोगॅम/प्रतिदिवशी १२० मायक्रोगॅम/प्रतिदिवशी १५० मायक्रोगॅम/प्रतिदिवशी २५० मायक्रोगॅम/प्रतिदिवशी प्रतिबंध :- आहारामध्ये आयोडिनयुक्त मीठाचा समावेश करावा. संतुलीत व सकस आहाराचा समावेश असावा. जंकफुड, मॅगी, बॅर्गर इ. समावेश असु नये. गलगंडची लक्षणे दिसताच त्वरीत रुग्णालयामध्ये जाऊन औषधोपचार घेणे. कार्यशाळा :- या अनुषगांने दि. १५/१०/२०२४ रोजी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांची जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली. आयोडिनयुक्त मीठाचा वापर करु या, गलगंड पासुन मुक्त होऊ या !