Mahila Sanvad News in Jalna

प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ..

प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ..

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

जालना,(जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी म्हणून  9 हजार 855 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विधानसभानिहाय पाच ठिकाणी दोन सत्रात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे, गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

जालना जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयामधील कार्यरत असलेल्या एकुण 14 हजार 720 अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्यात आली आहे. यामध्ये गट-अ 425, गट-ब 892, गट-क 12590 आणि गट-ड 813 असे एकुण 14720 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा  समावेश आहे. यापैकी पहिल्या प्रशिक्षणाचे आदेश 9 हजार 855 अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित तहसील कार्यालयाकडून तामिल करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी पहिल्या प्रशिक्षणात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत राहिल. मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान व दुपारच्या सत्रात प्रशिक्षण देण्यात येईल. तर मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना सकाळच्या सत्रात प्रशिक्षण व दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान देण्यात येईल. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी नम्रता चाटे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी  मतदान होणार आहे. प्रथम प्रशिक्षण 99- परतूर विधानसभा मतदारसंघासाठी परतूर येथील भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी नाट्यगृहात होणार आहे. 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी घनसावंगी येथील राजेगाव रोडवरील मॉडेल महाविद्यालयात होईल. 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी जालना येथील देऊळगाव राजा रोडवरील सेंन्ट मेरी हायस्कुलमध्ये होईल. 102- बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी बदनापूर येथील साक्षी मंगल कार्यालयात होईल. आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन येथील सिल्लोड रोडवरील समृध्दी लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *