जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल
जालना,(जिमाका) दि. 18 :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुट ओव्हर ब्रिजची उभारणीनिमित्ताने अंबड चौफुली-मोतीबाग जाणारा रस्ता रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1 वाजेपर्यंतच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग 753 वरील अंबड चौफुली-मोतीबाग ते छत्रपती संभाजीनगर चौफुली मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.
पर्याय मार्ग म्हणून बीड-अंबडकडून येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही जालना येथील मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-देऊळगाव राजा चौफुली- कन्हैयानगर-भोकरदन चौफुली बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. सदरचे आदेश दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत पुलाची उभारणी पुर्ण होईपर्यंत लागू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.